नगराध्यक्ष संजू परब यांची खा. नारायण राणे यांच्याकडे मागणी…
सावंतवाडी : विकास कामांना निधी मिळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेला झगडावं लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून सहजासहजी निधील दिला जात नाही आहे. मात्र, शहरातील विकासकामे आम्ही थांबू दिली नसून, शहराचा विकास सुरूच ठेवला आहे. काही तांत्रिक बाबींमुळे जिल्हा नियोजनमधून निधी दिला जात नाही आहे. आज नळपाणी योजना, बाजारपेठ सुशोभीकरण, पर्यटनात्मक विकासकांना सुरुवात केली आहे. मात्र, निधी दिला जात नाही आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला त्या संदर्भात आदेश देण्याची मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली. तर आपल्या माध्यमातून शहरविकासासाठी ५० लाखांचा निधी मिळावा अशी मागणी केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री खा. नारायण राणे यांच्याकडे नगराध्यक्ष संजू परब यांनी केली. यावेळी भाजपच्या ताब्यात नगरपरिषद आल्यानंतर पहिल्यांदाच आपले पाय नगरपालिकेला लागले हा सुवर्णक्षण असल्याची भावना नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केली आहे.