गावराई येथील वृद्धांची विहिरीत उडी मारून आत्महत्या

*⚡कुडाळ ता.२६-:* कुडाळ तालुक्यातील गांवराई टेंबवाडी येथील धर्माजी गावडे ( वय ७०) यांचा मृतदेह तेथील सार्वजनिक विहिरीत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. याबाबतची माहिती त्यांचे भाऊ दशरथ गावडे यांनी पोलिस स्थानकात दिली आहे. गेली अनेक वर्षं त्यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने त्यांच्यावर मानसोपचार तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. ते आजारपणाला देखील कंटाळले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page