भाजप शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचा नवदुर्गा पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आला सन्मान*

सावंतवाडी : घे भरारी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा भाजप सावंतवाडी शहराध्यक्षा सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन आयोजित नवदुर्गा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. मातोंड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून देखील राजकारण व समाजकारण या दोन्ही क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या अथक परिश्रमाने व प्रचंड मेहनतीतून मडगावकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाजपा महिला शहराध्यक्षा म्हणून काम करताना महिलांच्या समस्या त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांचे करत असलेले नेतृत्व हे उल्लेखनीय आहे.-त्यांच्या या अथक परिश्रमांची उच्च वैचारिक भूमिकेची आणि गतिमान चौफेर यशाची कार्याची विशेष दखल घेऊन त्यांचा नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page