वैश्यवाडा हनुमान मंदिर ते उभा बाजार येथील रस्ता खोदाईचे काम तूर्तास थांबवा…

रहिवाश्यांची निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

*⚡सावंतवाडी ता.२६-:* वैश्यवाडा हनुमान मंदिर ते उभाबाजार या रस्त्या खालून संस्थान कालावधीतील मुख्य पाईप लाईन असून, तेथील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या घराना येथूनच नळ कनेक्शन देण्यात आले आहे. ही पाईप लाईन आणि कनेक्शन जुनी असल्याने खोदकाम करताना तुटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एन दिवाळीत तेथील लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तूर्तास हे खोदकाम थांबवण्यात यावे. अशी मागणी तेथील रहिवाश्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच हे काम करताना या पाईप लाईन ला कोणताही धोका होणार नाही आणि पाणी वेळेतच सोडण्यात येईल अशी हमी नागरिकांना नगरपालिकेने द्यावी अशी देखील मागणी केली आहे.

यावेळी गोकुळदास शिरसाट, श्रीकृष्ण पिळणकर, दयानंद शिरसाट, दिगंबर शिरसाट, नरेश जिरंगे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page