विकास आराखड्याबाबत एकदिवशीय प्रशिक्षण

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा, पंचायत समिती, ग्रामपंचायत विकास आराखड्याबाबत उद्या दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचाय विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील या कळवितात. आमचं गाव आमचा विकास या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयाद्वारे निर्गमित केलेल्या पुरक मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन सन 2022-23 चा वार्षिक विकास आराखडा अंतिम करण्याबाबत सुचना आहेत. हा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page