कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या जमातवाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा

खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार

*⚡वैभववाडी ता.२५-:* खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ठिक ५ वा.जमातवाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आम. वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना युवा नेते संदेश पारकर, महिला आघाडी प्रमुख सौ निलम पालव, आदी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्यासाठी कोळपे जि. प. मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख श्री. मंगेश लोके, युवासेना सरचिटणीस श्री. स्वप्निल धुरी आणि अल्पसंख्याक तालुकाप्रमुख श्री. जावेद पाटणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page