शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले सन्मानित; पोलीसांच्या कामाचे कौतुक
*⚡वैभववाडी ता.२५-:* तालुक्यातील विविध गुन्ह्यांचा पोलिसांनी यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस ठाण्याचे पो.नि.अतुल जाधव यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी शाल,श्रीफळ देऊन जाधव यांना सन्मानित केले.अतुल रावराणे यांनी पोलीसांच्या कामाच कौतुक करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तालुक्यात गेल्या काही महीन्यात पोलीसांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये एटीएम मध्ये भरण्यासाठी आणलेली २३ लाख लुटीचा कर्मचाऱ्यांनी केलेला बनाव पोलिसांनी उघडकीस आणला होता.तसेच अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याचबरोबर शहरातील एका व्यापाऱ्यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींना चोवीस पकडले होते. यासारख्या अनेक गुन्ह्याचा यशस्वीपणे तपास करीत आरोपींना जेरबंद केले.पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उत्कृष्ट काम करीत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा शिवसेनेच्यावतीने आज सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, संजय चव्हाण,नगरपंचायतीचे माजी सभापती संतोष पवार,दिपक गजोबार, रोहन रावराणे, दिपक कदम आदी उपस्थित होते.
