बंदूक परवाना धारकांची ४ नोव्हेंबरला कट्टा येथे सभा

उपस्थित राहण्याचे अध्यक्ष काटकर यांचे आवाहन

*⚡ओरोस ता.२४-:* श्री ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटना, मालवण यांची सभा गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा, मालवण कट्टा चर्चच्या बाजुला आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील शेती संरक्षण शस्त्र परवानाधारकांनी वेळीच उपस्थित राहावे, अशी विनंती श्री ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटना, मालवण चे अध्यक्ष पंढरीनाथ मानाजी काटकर यांनी केली आहे.              श्री ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटनेच्यावतीने उदय सामंत  उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधूदुर्ग याकडे सादर केलेले व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले अर्ज या अनुषंगाने आलेल्या पत्रांचे वाचन व विचार विनीमय करण्यात येणार आहे, तरी जिल्ह्यातील शेती संरक्षण शस्त्र परवानाधारकांनी गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा, मालवण येथे वेळीच उपस्थित राहावे, अशी विनंती श्री ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटना, मालवण चे अध्यक्ष पंढरीनाथ मानाजी काटकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page