कणकवली नगरपंचायतीकडे वातानुकूलीत शवपेटी सुपूर्द

भाजपा ओबीसी सेलचे नरेंद्र गावकर व विजय घरत यांचे मानले आभार

*⚡कणकवली ता.२१-:* आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायतीला भाजपा ओबीसी सेलचे नरेंद्र गावकर व विजय घरत यांच्या माध्यमातून वातानुकूलित शवपेटी देण्यात आली असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे ती सुपूर्द करण्यात आली. कणकवली नगरपंचायतला ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भाजपा ओबीसी सेलचे नरेंद्र गावकर व विजय घरत यांचे आभार व्यक्त केले. येत्या काळात कणकवली शहरातील व्यक्तीचा मृत्यू होईल त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास उशीर असेल तर त्या मृताच्या नातेवाईकांना ही वातानुकूलित शवपेटी घरी नेण्यास देण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही शवपेटी पुन्हा नगरपंचायत जवळ उपलब्ध राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शवपेटीची मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांना शब्द दिला होता. कणकवली शहरातील मृत झालेल्या नागरिकांचे मृतदेह ठेवण्याकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोनच शवपेटी असल्याने अनेकदा ताटकळत राहावे लागते. यामुळे नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कणकवली शहराचे वाढते विस्तारीकरण व शहराची असलेली गरज या दृष्टीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही मागणी केली होती. या वेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक मेघा गांगण, अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड,कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष आण्णा कोदे, बंडू गांगण, राजू गवाणकर, उत्तम वाळके, संदीप राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page