नेमळे येथील कनिष्ठ विद्यालय परिसरात स्वच्छता अभियान

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गच्यावतीने राबविण्यात आले आयोजन

*⚡सावंतवाडी ता.२१-:* नेमळे येथील कनिष्ठ विद्यालय परिसरात नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गमार्फत जिल्हा समन्वयक मोहीतकुमार सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याला मुलांचे तसेच शिक्षक वर्गाचे चांगले सहकार्य लाभले. स्वच्छ भारत अमृत महोत्सव अभियान २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फ़त जिल्हा समन्वयक कुमार सैनी यांच्या मार्गदर्शनखाली बुधवारी नेमळे येथील कनिष्ठ विद्यालय येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. नेहरू युवा केंद्र समन्वयक विश्वजीत जाधव यानी प्राचार्य बोवलेकर मॅडम, शिक्षक वर्ग यांचे गुलाबपुष्प तर मुलांचे पुष्प देऊन स्वागत केले. श्री धामापुरकर सर यांनी स्वच्छ भारत या अमृत महोत्सवाचे महत्व मुलांना पटवुन देत मार्गदर्शन केले. समन्वयक विश्वजीत जाधव यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शालेचे विद्यार्थी व प्राचार्य कल्पना बोवलेकर तसेच शिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले

You cannot copy content of this page