काँग्रेसचे बांदा विभागीय अध्यक्ष संदेश भोगले यांचे निधन

*⚡बांदा ता.२१:* काल रात्रीपासून बेपत्ता असलेले येथील काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश भोगले यांचा मृतदेह त्यांच्या ताब्यातील कारमध्ये आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी येथील चेक पोस्ट परिसरात उघडकीस आली. उभ्या असलेल्या कारमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मृत भोगले हे काल सायंकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडले होते. ते उशिरा पर्यंत घरी परतले नाही. काल रात्रीपासूनच त्यांच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने त्यांची शोधा-शोध सुरु केली होती. दरम्यान आज सकाळी त्यांच्या ताब्यातील कार बांदा चेक पोस्ट परिसरात उभी असलेली आढळून आली. यावेळी कारची पाहणी केली असता आत ते मृतावस्थेत आढळून आले.दरम्यान घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page