*⚡मालवण ता.१६-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी भरती प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची भरती प्रक्रिया पार पडली. यात २२ विद्यार्थ्यांची निवड झाली. सिंधुदुर्गं महाविद्यालयामध्ये एनसीसी भरतीसाठी ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग आर्मी ऑफिसर आले होते. प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. भरती प्रक्रियेसाठी रनिंग, सीटअप, पुशअप, छाती, उंची अशा टेस्ट घेतल्या गेल्या. प्रथमच कॉलेजच्या इतिहासात अशाप्रकारे खास एनसीसीसाठी महाविद्यालयात प्रवेश घेऊन मिलिटरी मध्ये जाण्याच्या हेतूने सिंधुदुर्गच्या बाहेरच्या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचा उत्साह वाढला आहे. सांगली, सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी एनसीसी घेण्यासाठी सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक होते. मात्र मर्यादित जागा असल्यामुळे अनेकांना नकार द्यावा लागला, असे एनसीसी विभागाचे प्रमुख व लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी सांगितले. जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातून जे विद्यार्थी महाविद्यालयात एनसीसीमध्ये प्रवेशासाठी आले, त्यांची राहण्याची मोफत व्यवस्था कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाने केली.
एनसीसी मध्ये २२ विद्यार्थ्यांची निवड
