नगरपालिका महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजन..
⚡मालवण ता.०५-:
जागतिक महिला दिनानिमित्त मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने मामा वरेरकर नाट्यगृह येथे दि. ८ मार्च रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६ या वेळेत वाजेपर्यंत जागतिक महिला दिन कार्यक्रम व मालवण शहर मर्यादित महीला व मुलींकरिता पाककला आणि खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाककला स्पर्धेसाठी नाचणी पासून बनवण्यात येणारे पदार्थ असा विषय आहे. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या २५ महिलांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच मालवण शहर मर्यादित महीला व मुलींकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. पाककला स्पर्धा नाव नोंदणीसाठी खेमराज सावंत – ९५४५७२८८०२ यांच्याशी संपर्क साधावा, महिला व मुलींनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांनी केले आहे.
