संजू परब यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी, ता. ५-: माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज कणकवली येथील ‘ओम गणेश’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सावंतवाडी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. तसेच मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, आगामी विकासकामे आणि स्थानिक पातळीवरील काही महत्त्वाच्या विषयांवरही विचारविनिमय करण्यात आला.

या भेटीदरम्यान गुरु पेडणेकर, रोहित नाईक, कॅल्टस फर्नांडिस, चंदन नाईक, समीर पालव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page