⚡मालवण ता.०५-:
नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्यातून मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे होणाऱ्या भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त दिनांक 13 मार्च रोजी मसुरे डांगमोडे श्री देव रवळनाथ मंदिर नजीक मैदानावर
भव्य जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन सायंकाळी पाच वाजता करण्यात आलेले आहे.
यावेळी प्रथम क्रमांक रोख रुपये १०००० /-, आणि चषक,.
द्वितीय क्रमांक रोख रुपये ६०००/-, आणि चषक,.
तृतीय क्रमांक रोख रुपये २०००/-,
चतुर्थ क्रमांक रोख रुपये २०००/-,
आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला कै.शिवाजी ठाकूर भव्य स्मृती चषक..
याचप्रमाणे स्पर्धेतील बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांना रोख रुपये आणि स्मृती चषक देऊन गौरविण्यात येणार आहे..
स्पर्धेमध्ये प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धा सायंकाळी पाच वाजता सुरू करण्यात येणार असून येणाऱ्या सर्व खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक संघाने आपली नावे नितीन हडकर मो .
7249357239 आणि दत्तप्रसाद पेडणेकर
मो.9421145827 यांच्याकडे नोंदवावी असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांनी केले आहे..
