वैभववाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी…
⚡वैभववाडी ता.०५-: वैभववाडी पोलिसांनी कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे. एक वर्षांपूर्वीच्या सराईत गुन्हेगाराला सांगोला येथून अटक करण्यात आले आहे एप्रिल 2025 मध्ये नापणे येथील वयोवृद्ध पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर यांच्याकडे पाणी पिण्याच्या बहाण्याने जाऊन मारहाण करून गळ्यातील चैन चोरून गुलाम उर्फ कैवली आबास वय 40 हा फरार झाला होता. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे वैभववाडी तालुक्यात भीतीचे वातावरण झाले होते. पोलीस तपास करताना कोणतेही ठोस पुरावे नव्हते. गेली वर्षभर पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून तपास करण्याचा प्रयत्न केला आणि विविध ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली. मात्र पोलिसांना यश मिळाले नाही. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आणि फिर्यादी पुरुषोत्तम प्रभुलकर यांचे पुत्र संदीप प्रभूलकर यांनी सतत तपासासाठी पोलिसाकडे केलेला पाठपुरवठा यामुळे या घटनेचा तपास करणे पोलिसांसमोर मोठ्या आव्हान होते. वैभववाडी पोलिसांनी तपासात सातत्य ठेवून एक वर्षांनी यश मिळाले आहे. आरोपी याने गुन्हा कबुल केला असून दीड तोळे सोन्याची चैन बाजारात विकली. त्यातील पैसेही खर्च झाले. पैकी त्याच्या आईने 20 हजार रुपये पोलिसांना परत केले आहेत. गुलाम आबास हा सराईत गुन्हेगार असून गेल्या अनेक वर्ष गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.
या घटनेचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठ्या आव्हान होते. परंतु वैभववाडी पोलिसांनी प्रथम दर्शनी कोणतीही पुरावे नसताना धागेदोरे किंवा ठोस पुरावे नसतानाही आरोपीला शोधून काढण्यात यश मिळवले आहे.
आरोपीने गुन्हा कबूल केला असून सोन्याची चैन विकून पैसै संपवल्याचे मान्य केले. मात्र त्यातील 20 हजार रुपये त्याच्या आईने परत केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
