Headlines

आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये शिवकालीन साधनांचे प्रदर्शन…

महाराजांचा इतिहास जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवप्रेमींच कार्य कौतुकास्पद; सीताराम गावडे..

⚡ओरोस ता.०५-: विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिसाची माहिती व्हावी व आपला शिवकालीन इतिहास जिवंत रहावा यासाठी शिवप्रेमी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत.शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकालीन साधनांची (शस्त्रांची) माहिती व्हावी या उद्देशाने ,आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये एक दिवसीय शिवकालीन साधनांच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनाला प्रमुख अतिथी म्हणून सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग चे संपादक सीताराम गावडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान चे ज्ञानेश्वर राणे, आबा चिपकर, आरोस हायस्कूल चे संचालक सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मुळीक,मदन मुरकर, मुख्याध्यापक अनिल नाईक,तानाजी वरक, अण्णा पांचाळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग चे संपादक सीताराम गावडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.

प्रशालेच्या वतीने सीताराम गावडे, ज्ञानेश्वर राणे यांचा शाल ,श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री .गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,खरोखरच ज्ञानेश्वर राणे व त्यांचे सहकारी शिवकालीन इतिहास जिवंत ठेवण्याचे कार्य करत असून त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,नुसते महारांचे फोटो,त्यांचा पेहराव करून कोणी महाराज बनू शकत नाही तर त्यासाठी त्यांचा इतिहास जाणून घेऊन,तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा, तुमच आचरण कस आहे, तुमचे परिश्रम किती आहेत यावर तुमची ओळख होत असते.आपली भूमी ही साधुसंतांची असून ,आपणआपल्या आई वडिलांना कधीही विसरू नका त्यांचा आदर करा असेही सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मुळीक,मदन मुरकर यांच्या माध्यमातून व विद्या विकास हायस्कूल आरोस यांच्या सहकार्याने विद्या विकास या प्रशाळेत प्रथमच शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन व माहिती हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगणे आणि शिवकालीन इतिहासाची जाणीव करून देणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रदर्शनात मराठा शस्त्रागारातील शस्त्र मराठा धोप, दांडपट्टा, कट्यार ,बिचवा, वाघनखे, खंडा तरवार, नागीन तरवार, ढाल, जिरेटोप, तोफ ,जहाज यांच्या प्रतिकृती तसेच ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले.
प्रदर्शनात ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिवकार्याचे महत्त्व ,विविध गड किल्ल्यांची माहिती देत प्रात्यक्षिकांसह शिक्षणात्मक माहिती दिली. यावेळी मुलांनी प्रत्यक्षरित्या शिवकालीन शस्त्रे हाताळली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वरक तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अनिल नाईक यांनी केले.यावेळी शिक्षक देवयानी चव्हाण,श्रद्धा मुळीक, मिताली नाईक,कृपा नेमळेकर, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत,चेतन आरोसकर, श्रीम.मुळीक काकी,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रदर्शनाला संस्था उपाध्यक्ष निलेश परब ,सचिव राजन नाईक,सुरेश गावडे,संदीप नेमळेकर आदींनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

You cannot copy content of this page