दारिस्ते येथे गडनदी पात्रातील गाळ उपसा कामाचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.०६-: दारिस्ते येथील गडनदी पात्रातील गाळ उपसा कामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

गडनदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी गुरववाडी वस्तीत घुसत असे. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत होता. तसेच उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या कामामुळे गुरववाडी वस्तीत पुराचा धोका कमी होण्यास मदत होणार असून उन्हाळ्यात नदीतील पाणीसाठाही वाढणार आहे. परिणामी गुरववाडी, सुतारवाडी व पटेलवाडी या तीन वाड्यांतील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी दारिस्ते सरपंच सानिका गावंकर, उपसरपंच संजय सावंत, सुरेश गावंकर, गोपी सुतार, पोलीस पाटील हेमंत सावंत, संजय गावंकर, तात्या गुरव, ग्रामपंचायत सदस्य भाई सावंत, वैष्णवी सुतार, वृषाली कदम, नेहा सावंत, दाजी शेलार, भाऊ सावंत, विनायक गुरव, बाबी साळसकर, जीतू सावंत, केशव सुतार, गणेश गुरव, मदन गुरव, सुरेश गुरव, चेतन गुरव, भरत गुरव, भरत दारिस्तेकर, वासुदेव कदम, महेश सुतार, दशरथ लाड, बळीराम गुरव तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या योजनेमुळे दारिस्ते गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे व जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत यांचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page