सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपा सत्ता काबीज करणार:राजन तेली

सहकार कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढणार

कणकवली ता.१४ सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. या बँकेच्या निवडणुकीत कोणतेही राजकारण येऊ नये अशी आमची ही इच्छा होती. मात्र महाविकास आघाडीतील जिल्हा बँक निवडणुकीचे जागा वाटप पूर्ण केली आहे.केवळ जनतेची दिशाभूल केली जात आहे. सहकार क्षेत्रातील संस्था, लोकांना सोबत घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर भाजपा सत्ता काबीज केली जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. सहकार क्षेत्रात राजकारण येऊ नये अशी आमची इच्छा होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची भाजपची रणनीती पूर्ण झाली असून, चांगल्या पद्धतीने जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकला जाईल, असा विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page