सांगेली ग्राम पंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा

मळेवाडवर भाजपची सत्ता, सातार्डा सेनेकडे, साटेली वंचित आघाडीकडे सरपंच पद निवडी:विलवडे राहिले रिक्त

*⚡सावंतवाडी ता.१२-:* तालुक्यातील आज पार पाडलेल्या पाच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची पोटनिवडणुकीत बहुचर्चित ठरलेल्या सांगेली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने बाजी तर मळेवाड ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला गड राखला. सातार्डामध्ये शिवसेना तर साटेलीत वंचित आघाडीचा सरपंच विराजमान झाला. मात्र विलवडेमध्ये पुन्हा एकदा सरपंचपद रिक्त राहिले.सावंतवाडी तालुक्यातील पाचवी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते त्यामध्ये सांगेली ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप विरुद्ध महा विकास आघाडी अशी होणार असल्याने या ठिकाणी नेमका कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष होते मात्र महाविकासआघाडीने त्याठिकाणी भाजी महाराज सुवर्णा राऊळ त्यांच्या गळ्यात सरपंच पदाचे माळ घातली. येथे महाविकासआघाडी 5 तर भाजप उमेदवाराला 4 असे मतदान झाले.माळेवाडी मध्ये भाजप पुरस्कृत जनता गाव विकास पॅनलच्या मिलन पार्सेकर या विजयी झाल्या येथे भाजपाच्या सानिका शेवडे यांनी बंडखोरी करत शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅनल कडून उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्या ठिकाणी शिवसेनेचे दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याने आठ विरुद्ध एक अशा फरकाने पार्सेकर या विजयी ठरल्या. सातार्डा ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या संजना मेस्त्री या बिनविरोध निवडून आल्या तर साटेली ग्रामपंचायतीमध्ये वंचित आघाडीच्या मनीषा जाधव याच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली. तर विलवडे मध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणाचे दोन्ही सदस्य अपात्र ठरल्याने आजच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज न आल्याने या ठिकाणी निवडणूक होऊ शकली नाही त्यामुळे उपसरपंचाकडे प्रभारी सरपंच पद राहणार आहे. सांगेली ग्रामपंचायतीवर विजय मिळवण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ व काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page