जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाकडून मालवणातील लसिकरण मोहिमेचा आढावा

राज्यस्तरीय समितीचीही मालवणला भेट : आरोग्य अधिकारी उपस्थित

*⚡मालवण ता.१२-:* जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने मालवणातील कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण मोहिमेचा आढावा घेतला. तसेच शहरातील नागरिकांच्या घरी प्रथक्ष भेटी देत लसीकरण झाल्याची माहिती जाणून घेतली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी मुकेशकुमार जोशी व अन्य उपस्थित होते. लसीकरण केंद्रावर जाऊन ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील, आरोग्य सहायक बी आर कोरडे, आरोग्य सेवक एस ए चांदोसकर, के एम माजीक, आदी उपस्थित होते. राज्यस्तरीय पथकाकडूनही आढावा मालवणात सुरू असलेल्या लसिकरणाचा राज्यस्तरीय समिती पथकाकडूनही मंगळवारी आढावा घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गचे राज्यस्तरीय नोडल अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी लसिकरणाबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला.

You cannot copy content of this page