प्रवासी किरकोळ जख्मी…
*⚡मालवण ता.१२-:* मालवण कुडाळ या मार्गावर कुडाळच्या दिशेने जाणारी टोयोटा इनोव्हा ही गाडी कासारटाका नजीकच्या गणपती मंदिर जवळच्या रस्त्यावर आल्यानंतर अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हा गाडी पलटी झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात गाडीतील काही जणांना किरकोळ दुखापत झाली. आज मंगळवारी दुपारी मालवण वरून कुडाळला जाणारी टोयोटा इनोव्हा (क्र. एमएच ०६ ए.एस. ९५८६ ) ही गाडी मालवण वरून कुडाळच्या दिशेने जात होते या गाडीतून सहाजण प्रवास करत होते. गाडी कासारटाका नजीकच्या गणपती मंदिर जवळ आली असता गाडीतील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यानजीकच्या संरक्षक भिंतीला आदळून १० ते १५ मीटर अंतरावर फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला झाडीमध्ये पलटी झाली. या अपघातात गाडीतील काहींना किरकोळ दुखापत झाली. तर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीतून प्रवास करणारे सर्व प्रवासी हे कुडाळ तालुक्यातील असल्याचे समजते.
