हळवल तंटामुक्ती अध्यक्षपदी पत्रकार उमेश परब यांची बिनविरोध निवड

*⚡कणकवली ता.१२-:* हळवल तंटामुक्ती अध्यक्षपदी गावचे रहिवासी पत्रकार उमेश परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी तंटामुक्ती अध्यक्षांचा कार्यकाल संपल्यानंतर हळवल ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेश परब यांची सर्वानुमते हळवल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उमेश परब हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांना लिंगेश्वर कला क्रीडा मंडळ हळवल यांचा समाजमित्र व महापुरुष मित्रमंडळ कळसुली यांचा समाजप्रेमी हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रासोबत मागील 10 वर्षे ते पत्रकारीता करत आहेत. उत्तम क्रिक्रेटपटू असलेले उमेश परब हे क्रीडा समालोचकही आहेत. उमेश परब यांची सामाजिक कामात असलेली आवड लक्षात घेता ते तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी योग्य असल्याचा निर्वाळा उपस्थित ग्रामस्थांनी दिला. यावेळी आपण गावात योग्य प्रकारचे काम करून गावाला नावलौकिक मिळवून देऊ, असा विश्वास उमेश परब यांनी व्यक्त केला. उमेश परब यांची हळवल तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड होताच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page