६ जानेवारी २०२२ चा पत्रकार दिन याच भवनमध्ये होईल:जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत निर्णय;प्रसिद्धी प्रमुख म्हणून हरिश्चंद्र पवार यांची निवड
*⚡सावंतवाडी ता.१२-:* महाराष्ट्र राज्यासाठी भूषण नाव असलेले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन येत्या जानेवारी 22 पर्यंत पूर्ण करण्यात यावा असा महत्त्वपूर्ण ठराव आज पार पडलेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या त्रैमासिक सभेमध्ये संमत करण्यात आला तर सहा जानेवारी रोजी होणाऱ्या पत्रकार दिन सोहळा या वास्तूमध्ये साजरा होईल अशी अपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये व्यक्त करण्यात आली
जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारी मंडळाची मासिक सभा सिंधुदुर्गनगरी शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे पार पडली या सभेस सचिव उमेश तोरसकर खजिनदार ऍड संतोष सावंत उपाध्यक्ष रमेश जोगळे कार्यकारिणी सदस्य दिलीप उर्फ बाळ खडपकर हरिश्चंद्र पवार एकनाथ पवार यांची उपस्थिती होती या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त मंजूर झाल्यानंतर जमाखर्चाचा मंजुरी देण्यात आली यावेळी झालेल्या पत्रकार भवनाच्या कामाबाबत झालेल्या चर्चेनंतर सद्यस्थितीमध्ये विद्युतीकरणाचे काम सुरू असून येत्या दीड दोन महिन्यांमध्ये या भवनांचे काम पूर्णत्वास येईल या दृष्टीने पत्रकार संघाकडून अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून कामाची गती वाढविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे त्यामुळे सहा जानेवारी पत्रकार दिन या नव्या वास्तूमध्ये साजरा करण्याचा मनोदय यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांनी व्यक्त केला त्याला सर्व कार्यकारणी सदस्यांनी एकमताने सहमती दर्शवली मराठी पत्रकार परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध प्रमुखपदी हरिश्चंद्र पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.यावेळी झालेल्या चर्चेमध्ये नव्या भवनच्या वास्तूचे परिपूर्ण काम झाल्यानंतरच ह्या वास्तूचा ताबा घेतला जाईल चांगले काम व्हावे या दृष्टीने कामावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे अध्यक्ष जेठे यांनी सांगितले दरम्यान पत्रकार संघाच्या चेंज रिपोर्ट बाबत चर्चा करण्यात आली तर सभासदांना ओळखपत्र देण्याबाबतही चर्चा झाली वार्षिक वर्गणी बाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली यावर्षीची वार्षिक फी सर्व सदस्याने जमा कारण सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष जेठे यांनी केले पत्रकार संघाचा जमाखर्च खजिनदार ॲड संतोष सावंत यांनी सादर केला त्यानंतर सदस्यांनी सुचवलेल्या आयत्या वेळच्या विषयांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या सदस्यांना राज्य पत्रकार परिषदेमध्ये संलग्न करण्याबाबत निश्चित करण्यात आले त्याबाबतचा ठराव सचिव उमेश तोरस्कर यांनी मांडला सभेच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे सदस्य कै.सचिन नारकर तसेच ज्येष्ठ पत्रकार टी एन नाईक यांच्या पत्नी कै.विमल नाईक आणि वेंगुर्ले येथील पत्रकार दाजी नाईक यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
