नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपरिषद प्रभाग क्र. ७ मध्ये आज कोव्हीशिल्ड लसीकरण मोहिम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मालवण शहरात ९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या प्रभागनिहाय कोव्हीड १९ प्रतिबंधीत लसीकरण मोहीमेअंतर्गत आज प्रभाग क्र ७ मध्ये नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या आयोजनाखाली कोव्हीशिल्ड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला क्र. ७ प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तुळजाभवानी मंदिर वायरी लुडबेवाडी येथे ७७ नागरिकांनी तर समाज मंदिर, एस.टी. बस डेपो मागे येथे ३३ नागरिकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. नगरपालिका कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला.. नगरसेवक आप्पा लुडबे यांचे आयोजनाखाली कांता लुडबे, संजय लुडबे, भाई लुडबे, प्रफुल्ल लुडबे, शैलेश लुडबे, नारायण लुडबे, झिला लुडबे, प्रभाकर लुडबे, बबन मालवणकर, अमित जाधव, महेश मालवणकर, किशोर मालवणकर, भरत मालवणकर यांनी सहकार्य केले. उद्या १२ ऑक्टोबर रोजी प्रभाग क्र.६ मध्ये कोव्हीशिल्ड लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
