लखीमपूर घटनेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

वैभववाडी प्रतिनिधी ‌उत्तरप्रदेश येथील लखिमपुर घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. तालुक्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी वैभववाडी तहसीलदार यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला. उत्तरप्रदेश येथील लखीमपुर येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारण्यात आले.या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यात या बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नायब तहसिलदार अशोक नाईक यांना निवेदन दिले. या घटनेचा निषेध करीत यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी लोरे जि.प.सदस्या पल्लवी झिमाळ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, काँग्रेस माजी जि.प.सदस्या सुगंधा साटम,शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर,उपाध्यक्ष वसंत नाटेकर,वैभववाडी तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष अशोक राणे,काँगेस महिला तालुका अध्यक्ष मीना बोडके,युवक अध्यक्ष भालचंद्र जाधव, शिवसेनेचे अशोक रावराणे, प्रदीप रावराणे,माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, रवींद्र रावराणे,नेर्ले सरपंच आर.बी .जाधव,सुनील रावराणे, संजय निकम,दिपक गजोबार,संतोष बोडके याच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. फोटो:वैभववाडी नायब तहसीलदार अशोक नाईक यांना निवेदन देतांना वैभववाडी तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page