गुंडगिरी करणाऱ्या आ. नाईक यांनी आ. केसरकर यांच्याकडून संयमाचे धडे घ्यावेत…

भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा टोला; महाविकास आघाडीच्या बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी लावले धुडकावून

*⚡सावंतवाडी ता.११-:* आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत गुंडगिरी करत व्यापाऱ्यांची दुकाने बंद केलीत. ही वागणूक अशोभनीय असून, आमदार दीपक केसरकर यांच्या कडून त्यानी संयमाचे धडे घ्यावेत असा टोला भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी लगावला आहे. आजच्या बंद बाबत आमदार दीपक केसरकर यांनी व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे आवाहन केले नव्हते. त्यामुळे ते नक्की महाविकास आघाडी मध्ये आहेत की नाही असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. तसेच जिल्ह्यात सर्वत्र व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवून महा विकास आघाडी सरकारच्या आवाहानाला धुडकावून लावले आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्यांचीच दुकाने उघडी असल्याने महा विकास आघाडी सरकारचे पितळ उघडे पडले असल्याची टीका श्री. परब यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.यावेळी बंटी पुरोहित,महेश पांचाळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page