ओसरगाव नं. १ प्रशालेत संगणक कक्षाचे उद्या उद्घाटन

शतक महोत्सवी वर्षानिमित्त लोकसहभागातून उभारला संगणक कक्ष

*⚡कणकवली ता.११-:* जिल्हा परिषद शाळा ओसरगाव नं. १ या प्रशाळेचे शतक महोत्सवी वर्ष संपन्न होत आहे. या शतक महोत्सवानिमित्त मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी प्रशालेत लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्व नियम पाळून सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. ओसरगाव सरपंच प्रमोद कावले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते विलास राणे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत, बोर्डवे केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर आदी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास कोरोनाचे सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशालेच्या, ग्रामस्थांच्या आणि आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page