महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन येताना सावंतवाडीतील युवकांचा आंबोलीत अपघात…

२ युवक गंभीर तर २ युवक किरकोळ जख्मी; गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन झाला अपघात

*⚡सावंतवाडी ता.११-:* कोल्हापूर हुन श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन सावंतवाडीत येत असताना आंबोली हिरण्यकेशी येथे गाडीचा अपघात होऊन सावंतवाडीतील २ युवक गंभीर जख्मी झाले आहेत तर २ युवक किरकोळ जख्मी झाले आहेत. हा अपघात काल रात्री उशिरा घडला असून, त्यांचावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर हुन श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन सावंतवाडीतील ४ युवक आपल्या ताब्यातील टियागो गाडी घेऊन सावंतवाडीत येत असताना आंबोली येथे हिरण्यकेशी येथे डोळा लागल्याने गाडीवरचा ताबा सुटून अपघात झाला आहे. या गाडीत सावंतवाडीतील ज्ञानेश्वर पाटकर, चंद्रकांत धरणे, सनी जाधव आणि योगेश बेळगावकर हे युवक प्रवास करत होते. यातील ज्ञानेश्वर पाटकर आणि चंद्रकांत धरणे हे युवक गंभीर जख्मी झाले असून, त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सनी जाधव आणि योगेश बेळगावकर हे युवक किरकोळ जख्मी झाले असून, त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

You cannot copy content of this page