सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानची रक्तदान चळवळ कौतुकास्पद

नगराध्यक्ष संजू परब : सावंतवाडीत रक्तदान शिबिर कार्यक्रमास प्रतिसाद

*⚡बांदा ता.१०-:* कोविड महामारीत महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट व समयसुचक नियोजनामुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा झाला. प्रतिष्ठानची रक्तदान चळवळ ही कौतुकास्पद व समाजशील असून ही चळवळ भविष्यात युवा पिढीच्या माध्यमातून अधिक व्यापक होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी येथे केले. येथील काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी श्री. परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, रिक्षा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधीर पराडकर, नगरसेवक मनोज नाईक, डॉ. जनार्दन बावणे, ज्येष्ठ रक्तदाते आनंद वेंगुर्लेकर, विद्या वेंगुर्लेकर, विठ्ठल कदम, रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, तालुका उपाध्यक्षा सुप्रिया मोडक, अतुल कासार, एकनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page