*⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील असलदे येथे ज्या वयोवृद्ध व व्याधीग्रस्थ आहेत. त्यांना प्रवास शक्य नाही अशा नागरीकांना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लसिकरण करण्यात आले आहे असलदे सरपंच पंढरी वायंगणकर व ग्रामसेवक , ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य विभाग घरोघरी जाऊन लसिकरण राहीलेल्या नागरिकांना दिलासा देत आजपर्यंत 95.81 टक्के लसिकरण पूर्ण होत आहे.रविवार सुट्टी असली तरी सुद्धा लसिकरण होत आहे. आज व इतर राहीलेले गावातील काही दिवसांतच पूर्ण होणार आहे नागरिकांना लसिकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे . यामुळे लवकरच आम्ही असलदे 100 टक्के कोरोना प्रतिबंधक लसिकरण पूर्ण करु असा विश्वास सरपंच पंढरी वायंगणकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी आरोग्य विभाग यांच्या वतीने आरोग्य सेवक नागेश मुसळे, आरोग्य सेविका पवार , आशा सेविका नरे आदी उपस्थित होते.
असलदेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण घरोघरी सुरू
