शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांचा इशारा
*⚡बांदा ता.१०-:* बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा ते शेर्ले भागात रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झुडपे वाढली आहेत. चार दिवसांपूर्वी समोरून येणारे वाहन झुडपांमुळे न दिसल्याने एक अपघात झाला. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झुडपांमुळे कोणताही अपघात झाल्यास तसेच येत्या आठ दिवसांत सदर झुडपे न तोडल्यास थेट सावंतवाडी कार्यालय गाठत अधिकाऱ्यांनाच घेराव घालण्याचा इशारा, शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी दिला.
