*⚡बांदा ता.१०-:* श्री माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये सोमवार ११ रोजी सत्यनारायण महापूजा, रात्री बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ,कवठी, मंगळवार १२ रोजी सायंकाळी ७ सुश्राव्य भजन, बुधवार १३ रोजी सायंकाळी निमंत्रित भजन मंडळे यांची भजने, गुरुवार १४ रोजी रात्री ८ ते १२ वाजता फुगडी, शुक्रवार १५ रोजी विशेष कार्यक्रम पावणी दसरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांची याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी कडुन करण्यात येत आहे.
रोणापाल माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
