आडेली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १२ ऑक्टोबरला निवडणूक

*⚡वेंगुर्ले ता.१०-:* तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेली एक वर्ष रिक्त आहे. या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी मंगळवार १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता निवडणूक जाहीर झाली आहे. आडेली ग्रामपंचायत च्या सरपंच श्रीम. समिधा कुडाळकर यांचे विरुध्द विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर झालेला होता. त्यामुळे सरपंच पद रिक्त होते. गेले वर्षभर या पदाचा पदभार उपसरपंच संतोष कसले यांच्याकडे होता. दरम्यान मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील नियम ३३ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत आडेली मधील निवडून आलेल्या सदस्यांमधून १२ ऑक्टोंबर रोजी सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात येईल. एकूण १२ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये एक पद बाद असल्यामुळे ११ सदस्यांमधून निवडणूक होणार आहे. त्यामुळे अकरा मधील सरपंच पदाच्या आरक्षणानुसार कोणाच्या गळ्यात ही माळ पडते ते निवडणुकी दिवशी स्पष्ट होणार आहे.

You cannot copy content of this page