Headlines

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या सावंतवाडी तालुक्यात बंदची हाक

महाविकास आघाडीच्या तिन्ही तालुका प्रमुखांचे व्यापाऱ्यांना आवाहन

*⚡सावंतवाडी ता.१०-:* उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील तिन्ही जिल्हा प्रमुखांनी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी सोमवार दि. ११ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा.पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी सावंतवाडीत बंद पाळावा असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच उत्तर प्रदेश लखीमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून त्यांचे प्राण घेण्यात आले. याचा निषेध व्यक्त करून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील व्यापारी नागरिक यांनी शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सिंधुदुर्ग बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले आहे. शिवसेना तालुका सचिव रूपेश आईर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर माजी नगरसेवक सुरेश भोगटे, काँग्रेस शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, शिवसेना शहर प्रमुख शब्बीर, विशाल सावंत मणियार आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page