दाभोली इंग्लिश स्कुल दाभोलीच्या स्वप्नाली मूननकर-पिळणकर यांचा संत मीराबाई आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

*⚡सावंतवाडी ता.१०-:*  सिंधुदूर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय  शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा सन्मान व मकर स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार दि.०९ ऑक्टोबर २०२१ रोजी सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कुलच्या सभागृहात सौ.वनिता यशवंत तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.     यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका स्वप्नाली सुरेश मूननकर-पिळणकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना संत मीराबाई आदर्श शिक्षिका पुरस्काराने अध्यक्ष सौ.वनिता तेंडोलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.     यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष अनिलन राणे,सचिव गजानन नानचे,उपाध्यक्ष सुहास देसाई,धनश्री गावडे,शर्मिला गावकर,पांडुरंग दळवी, सल्लागार काका मांजरेकर,जिल्हा पतपेढी संचालक अजय शिंदे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष शाबी तुळसकर,प्रदीप सावंत,सावंतवाडी तालुका अध्यक्ष वैभव केंकरे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page