आम.नितेश राणेंची संबधीत विभागाला 15 दिवसांची डेड लाईन; अन्यथा तीव्र आंदोलन
*⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालूक्यातील नांदगावातील बॉक्सवेलच्या सर्व्हीस रस्त्यांबाबत 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. प्रहार भवन येथे संबधीत विभाग व प्रांत नांदगाव शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे आम नितेश राणे यांनी बोलताना सांगीतले असून आणि जर त्यांना आम्ही फक्त 15 दिवसांची मुदत देणार आहोत . यानंतर मात्र काय करायचे आहे ते आम्ही आमंच्या पध्दतीने करू असा इशारा देत संबधीत विभागाला आम.नितेश राणेंनी 15 दिवसांची डेड लाईन दिल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे उ होत असलेल्या बैठकीमुळे आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर उपसरपंच निरज मोरये यांनी सांगितले आहे. कणकवली तालूक्यातील नांदगावातील बॉक्सवेलच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे .नांदगाव तिठा ,नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे .तसेच प्रवासी निवारा शेड ,दिशा दर्शक फलक ,योग्य प्रकारे गटार व्यवस्था नसल्याने हायवेजवळील घराघरात अतिवृष्टीमध्ये पाणी घुसणे आदी विषयांवरून नांदगाव ग्रामस्थांचे सकाळी 11 वाजल्यापासून ठीय्या आंदोलन सुरू झाले होते. संबधित विभागाचे खारेपाटण येथील उपअभियंते श्री. कुमावत यांनी आंदोलनकांना सामोरे जात त्यांना वस्तुस्थीती सांगून आंदोलन स्थगीत करण्याची विनंती केली मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. एकदाचा अंतीम निर्णय काय तो दया अन्यथा आम्ही हटणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला .तद्नंतर दुपारी 3 च्या दरम्यान या विभागाचे आम.नितेश राणे यांनी आंदोलन स्थळी भेट देत चर्चा केली व रस्त्यांच्या व्यतीरिक्त कामे पेडींग आहेत ती त्वरीत सोडवून घेवू व व सर्व्हीस रस्त्यांबाबत भुसंपादन झाल्यांनतर होईल .तसेच भसुसंपादन प्रक्रीया कुठे थांबली व ती जलद गतीने कशी होईल याबाबत विचार करण्यात येणार आहे. आम. नितेश राणे बोलताना पुढे म्हणाले की आम्ही गेल्या वर्षीही एकत्र येत आंदोलन केले होते परंतू त्यावेळी संबधित विभागाने दिलेले आश्वासन पाळले नाही व केंद्र सरकार व राज्य सरकार येथे काही विषय प्रलंबित आहेत यामुळे मी स्वत: पाठपुरावा करेन तांत्रीक विषयांसाठी उद्या बैठक प्रहार भवन येथे 11 वा. घेणार आहे .आणि त्यांना 15 दिवसांची डेड लाईन देणार आहे 15 दिवस सुध्दा जास्तच होत आहेत आणि जर या कालावधीत संबधित प्रश्न मार्गी न लागल्यास मोठे तिव्र आंदोलन , नंतर मात्र प्रशासनाने व पोलीस यांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी घ्यावी असा इशारा आम. नितेश राणे यांनी दिला आहे. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर , तालूकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर उपसरपंच निरज मोरये, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य अरुण बापार्डेकर,मजीद बटवाले,गवस साठविलकर , मंगेश पाटील,वृषाली मोरजकर , रेणूका पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,भाई मोरजकर, अब्दुल नावलेकर , करीम बटवाले, इक्बाल बटवाले, तसेच हायवे बाधीत शेतकरी वर्ग आदी उपस्थित आहेत. पोलीस निरीक्षक हुंदळेकर , वाहतूक पोलीस निरीक्षक के.एस.जाधव तसेच महेते ,जांभळे ,बावधाने आदी पोलिस कर्मचारी आंदोलन स्थळी दाखल होते .
