बॅ. नाथ पै यांचे गुण सर्वांनी घेतले तरच संविधान आणि लोकशाहीचा पाया मजबूत होईल

माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांचे प्रतिपादन

मालवण दि प्रतिनिधी “बॅ .नाथ पै यांचे अमोघ वक्तृत्व, जनतेशी बांधिलकी, प्रेम ,बहुश्रुतता हे गुण विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि सामान्य मतदारापासून त्यांच्या पुढा-या पर्यंत सर्वांनी घेणे आवश्यक आहे ,तरच भारताच्या संविधानाचा, लोकशाहीचा पाया मजबूत होईल असे प्रतिपादन ज्ञानदिप हायस्कूल वायंगणीचे माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांनी येथे बोलताना केले राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती या दिनाचे औचित्य साधून बॅ .नाथ पै सेवांगण मालवण आणि साने गुरुजी कथा माला मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे येथील बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा नं .१ येथे बॅ .नाथ पै यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा आचरे प्रभागात शुभारंभ करण्यात आला त्यावेळी श्री पेडणेकर हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रकाश पेडणेकर, रविंद्र मुणगेकर ,मनोज गिरकर ,सुगंधा गुरव, स्मिता जोशी, मनाली फाटक, पांडुरंग कोचरेकर , सुरेश ठाकूर तसेच नवनाथ भोळे , संजय परब ,सायली परब ,संजय जाधव ,श्रुती गोगटे ,अरुण आडे , भावना मुणगेकर ,कामिनी ढेकणे , संजय रोगे आदी उपस्थित होते . या वेळी रामचंद्र कुबल आणि सुगंधा गुरव यांनी बॅ .नाथ पै आणि महात्मा गांधी ,लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याचे अभिवाचन केले तर नाथ पै सेवांगण कुटुंबकल्याण केंद्राचे समुपदेशक मनोज गिरकर यांनी नाथ पै सेवांगण आणि समुपदेशन केंद्र यांची माहिती दिली . या वेळी आचरे प्रभागातील गरीब होतकरु अशा २७ मुला मुलींना नाथ पै सेवांगण यांच्या वतीने शैक्षणिक प्रोत्साहनपर मदत निधीचे वाटप करण्यात आले तसेच साने गुरुजी कथामाला मालवणच्या वतीने कल्पना मलये लिखित “कारटो”ह्या मालवणी कादंबरीचे वितरण करण्यात आले .तर उपस्थित पालकांना साने गुरुजी कथामालेच्या वतीने ग्रंथ भेट देण्यात आली यावेळी आचरे प्रभागातील वाचन मंदिरांना अध्यक्षांच्या हस्ते खासदार विनायक राऊत यांनी दिलेली ग्रंथ भेट “सिंधू साहित्य सरिता “ह्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page