सावंतवाडी शहरासाठी आजी-माजी पालकमंत्र्यांनी अंतर्गत मतभेद दूर करावेत

संजू परब; तीन महिने उलटूनही शहराच्या विकासासाठी निधी दिला नाही

*⚡सावंतवाडी ता.२९-:* शहराच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यातील अंतर्गत मतभेद आड येत असून, त्यानी सर्वप्रथम आपल्यातील मतभेद दूर करावेत. असा सल्ला सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. दरम्यान खड्डे भरण्यासाठी मागील दोन वर्षांपासून ३५ लाख रुपयांचा निधी दिला नाही. असे ते म्हणाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत ज्यावेळी शहरातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी शहरात आले होते. त्यावेळी सभागृहात बोलताना मी म्हणालो होती की, हरिश्चंद्र राजाने स्वप्नात दिलेले वचन पाळले होते. त्याप्रमाणे आपण पाळावे. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी येत्या तीन महिन्यात शब्द पाळण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तीन महिने उलटूनही शहराच्या विकासासाठी प्रत्यक्षात निधी दिला नाही.असे परब म्हणाले.

You cannot copy content of this page