सहा महिन्यांपूर्वी मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही

ओळख पटण्यासाठी देवगड पोलिसांचे आवाहन

*⚡देवगड ता.२९-:* देवगड अमरवाडी येथून भाटिकडे जाणाऱ्या रस्त्याचे बाजूला छोट्या पुला नजीक गटाराचे पाण्यात ५० वर्षे वयाच्या अनोळखी इसम २६ मार्च रोजी सकाळी ८चे दरम्यान मयत स्थितीत आढळून येऊन देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.व तपास करण्यात आला तरी देखील त्याची ओळख पटली नसून या इसमाची उंची ५ फूट ४इंच,, गहू वर्न चेहरा उभट डोकिखालील भागास टक्कल,केस बारीक अर्धवट पिकलेले,मिशी राखलेली, व दाढी साधारण वाढलेली,अर्धवट पिकलेली, अंगात लांब बाह्यचे गुलाबी रंगाचा शर्ट ,सफेद रंगाचे बनियन,काळ्या रंगाचे फुलपॅन्ट, निळसर काळसर रंगाची अंडरवेअर काळ्या चौकलेती रंगाची सँडल, गळ्यात जानवे,कमरेस करदोडा अशा वर्णाची व्यक्ती असून या व्यक्तीची ओळख अथवा परिचित व्यक्तींनी देवगड पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page