नवोदय विद्यालयासाठी वराडच्या मैथिली नांदोस्करची निवड

*⚡मालवण ता.२९-:* ऑगस्ट २०२१ मध्ये इ.६ वी साठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणीत मालवण तालुक्यातील वराड येथील सौ.हि.भा. वरसकर विद्यामंदिरची विद्यार्थ्यांनी मैथिली रमेश नांदोस्कर हीची निवड झाली आहे. सलग दोन वर्ष वरसकर विद्यामंदिरचे विद्यार्थी या निवड चाचणीमध्ये यशस्वी होत आहेत. मैथिली नांदोसकर हिला प्रशालेचे शिक्षक श्री.चौकेकर, सौ.मयेकर, श्री. गोसावी,श्री. अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. मैथिलीच्या या यशाबद्दल वराड ग्रामस्थ संघ,मुंबईचे अध्यक्ष श्री. अरुण गावडे, शालेय समिती चेअरमन श्री. केशव परुळेकर , पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक तानाजी पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page