संत रोहिदास सेवाभावी संस्था सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी अंकुश किंजवडेकर

*⚡कणकवली ता.२९-:* संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी अंकुश किंजवडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सिंधुदुर्गनगरी येथील आरोग्यसेवकांच्या पतपेढीमध्ये संस्थेचे संचालक आणि कोकण विभाग अध्यक्ष प्रा. भिकाजी नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे राज्याधक्ष्य संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सभा नुकतीच पार पडली. कुडाळ तालुका सदस्य असलेले अंकुश किंजवडेकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून समाजाला भरीव असे योगदान दिले आहे याचीच दखल घेऊन राज्यपातळीवरून अंकुश किंजवडेकर यांची बिनविरोध सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली. यावेळी किंजवडेकर यांनी संस्थेने दिलेल्या पदाला योग्य न्याय मिळून देऊन रोहिदास समाजाला विविध माध्यमातून एकत्र आणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवाभावी संस्था अधिक मजबूत करणार असल्याचे विचार व्येक्त केले. यावेळी कोकण विभाग आणि राज्याच्या वतीने अंकुश किंजवडेकर यांचा नियुक्तीपत्र ,शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच माजी गृहराज्यमंत्री दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने देण्यात आलेले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संस्थेचे राज्य सचिव प्रसाद मसुरकर आणि जिल्हा उपाध्यक्ष दत्तकुमार फोडेकर यांचा देखील संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे राज्याधक्ष्य संजय कदम यांनी संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच. प्रसाद मसुरकर, रवींद्र पावसकर, भिकाजी नेरकर, पंढरी जाधव, युवराज पोवार, गुरू पेंटर, गुरू तेंडुलकर यांनी विचार वेक्त केले. या सभेला राज्यपदाधिकारी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सचिव प्रसाद मसुरकर यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार जिल्हा सचिव अंकुश किंजवडेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page