त्यांना घरीच राहणे वाटले उचीत;नगराध्यक्ष संजू परब यांचा आरोप
*⚡सावंतवाडी ता.२९-:* शहरातील मालमत्ता करवाढी संदर्भात आज नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेस भाजपच्या सर्व नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवत मालमत्ता कर वाढीस विरोध दर्शवला आहे. कोरोना मुळे नागरिक आर्थिक संकटात असून, मालमत्ता कर वाढवणे अयोग्य असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले आहे. परंतु, या विशेष बैठकीस मात्र शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवली होती. मालमत्ता कर वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना या कठीण काळात आर्थिक भुर्दंड बसणार आहे. हे माहीत असूनही शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित राहत. घरीच बसून राहणे उचित समजले असा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. शहरात मालमत्ता कर पंचवीस टक्के घरपट्टी वाढी बाबत विशेष सभा नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात नागरीकांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सद्यस्थितीत घरपट्टी वाढ नकोच, असा ठराव यावेळी भाजपाचे नगरसेवक सुधीर आरीवडेकर यांनी मांडला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी यांनी शहरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे बेताचीच बनली असल्याने घरपट्टीत वाढ करण्यात येऊ नये, असे अनुमोदन दिले. भाजपच्या सदस्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन उपस्थिती दर्शविल्याने कोरम पूर्ण झाला होता. मात्र शिवसेना नगरसेविकांनी सभेवर पाठ फिरवली होती. या सभेत उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक राजू बेग, मनोज नाईक यांनी चर्चेत सहभाग घेतला. सावंतवाडी शहरातील घरपट्टी वाढीबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे नागरीकांचे लक्ष होते. दरम्यान त्यासाठी आज विषेश सभा बोलविण्यात आली होती. सभेच्या सुरवातील भाजपाचे काही सदस्य अनुपस्थित राहील्यामुळे ही सभेबाबत प्रश्न निर्माण झाला.मात्र वेळेत काही जण उपस्थित राहीले, तर अन्य नगरसेवक ऑनलाईन जॉईन झाले. त्यामुळे ही सभा शिवसेना नगरसेविकांनी पाठ फिरवली असली तरी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतली. यावेळी नगरसेवक राजू बेग यांनी पालिकेचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे अन्य गोष्टींच्या माध्यमातून कर वाढविता येवू शकतो का, याचा प्रशासन आणि पदाधिकार्यांनी अभ्यास करावा, व तसा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तसेच शहरात पाचशेच्या खाली घरपट्टी असलेल्या अनेक मालमत्ता आहेत. त्यांच्यामुळे पालिकेला काही उत्पन्न होत नाही. त्यामुळे त्या मालमत्ताचा कर वाढविल्यास त्याचा फायदा पालिकेलाच होणार आहे. त्यामुळे सकारात्मक निर्णय घ्या, तसा ठराव आपण पुढच्या बैठकीत घेवू, अशी चर्चा झाली. नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची बनली आहे त्यामुळे या वेळी घरपट्टी वाढीचा विचार केला जाऊ नये तसेच शहरातील नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसणार असल्याचे माहिती असून सुद्धा विरोधी नगरसेवक आलेले नाही याची नोंद नागरिकांनी घ्यावी. घरपट्टी वाढीबाबत लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच पुढे निर्णय घेतला जावा असे देखील नगराध्यक्ष परब म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर म्हणाले, प्रशासनाचा भाग मालमत्ता कर वाढविण्याबाबत कौन्सिल समोर ठेवण्याचा होता तसे आम्ही ठेवले आहे शहरातील मालमत्ता बाबतचा आढावा घेऊन नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विचार करण्याची गरज आहे यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते.
