जिल्ह्यातील ४३७ अंगणवाड्याना नाही स्वतःची इमारत

सिंधुदुर्गनगरी ता २९ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण कार्यरत १५९१ अंगणवाड्यांपैकी तब्बल ४६७ अंगणवाड्यांना स्वतःच्या मालकीची इमारत नसल्याची बाब आजच्या महिला व बालविकास विभागाच्या सभेत उघड झाली. तर ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही अशा अंगणवाड्यांना स्वतःची इमारत मिळण्यासाठी जागा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा. असे आदेश सभापती शर्वांनी गावकर यांनी सभेत दिले. जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती शर्वानी गावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा. क.) अमोल पाटील, समिती सदस्या सायली सावंत, राजलक्ष्मी डीचवलकर, वर्षा कुडाळकर, पल्लवी झिमाळ, तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १५९४ अंगणवाडी केंद्रे मंजूर असून सध्यास्थितीला ११९१ केंद्रे कार्यरत आहेत. या अंगणवाडी केंद्रापैकी ११२४ अंगणवाडी या स्वतःच्या मालकीच्या जागेत आहेत. तर १७१ अंगणवाड्या ह्या खासगी जागेत, २२५ प्राथमिक शाळा इमारतीत, ७१ अंगणवाड्या समाजमंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणी भरविण्यात येत आहेत. या ४६७ अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही. अशी माहिती सभेत देण्यात आली. ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत देण्यासाठी सर्वांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश सभापती शर्वांनी गावकर यांनी सभेत दिले. जिल्ह्यात माहे ऑगस्ट मध्ये करण्यात सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील ९२७ बालके कमी वजनाची आहेत, तर ८६ बालके ही तीव्र कमी वजनाची असल्याची माहिती सभेत देण्यात आली. या कमी वजनाच्या मुलांच्या वजनात वाढ करण्यासाठी विशेष काळजी घ्या अशी सूचना सभापतींनी केली.

You cannot copy content of this page