*💫सावंतवाडी दि.१९-:* केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथक विक्रेता आत्मनिर्भर निधीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा अग्रणी कार्यकारणी अधिकारी बॅंक ऑफ इंडियाचे नंदकुमार प्रभुदेसाई, युनियन बँकेचे राजकुमार पंडित, बँक ऑफ इंडियाचे मुकेश मेश्राम, एसबीआयचे ठाकुर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद झाले होते. त्यांना खेळते भांडवल पुरवण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू केली. शहरातील पथविक्रेत्यांना दहा हजार रुपयांचे खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर्जाची परतफेड पुढील एका वर्षात करायची आहे. जे लाभार्थी नियमित परतफेड करतील त्यांना ७ टक्के व्याजाची रक्कम सबसिडी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर परत जमा केली जाणार आहे. सावंतवाडी शहरातील अर्ज सादर केलेल्या २८९ पथविक्रेत्यांपैकी २०८ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. आतापर्यंत १९६ लाभार्थ्यांना १९ लाख ६० हजाराचे कर्ज वितरित करण्यात आले असून आज ‘ पथ विक्रेता दिवस’ साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील अग्रणी बँकेच्यामार्फत हा कार्यक्रम सावंतवाडी शहरात पार पडला. नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते या पथविक्रेत्यांना या कर्जाच वितरण करण्यात आले. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी पथविक्रेत्यांना चालना मिळाली आहे.
पंतप्रधान पथक विक्रेता आत्मनिर्भर निधीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते वितरण
