*💫मालवण दि.१९-:* मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिरात दि.२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ ते २७ डिसेंबर या कालावधीत नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा होणार आहे. सोमवार दि. २८ रोजी सकाळी श्री दत्त गुरुचे पूजन, श्री दत्त गुरूंच्या पादुकांवर अभिषेक व महाआरती, सायंकाळी स्थानिक भजन, रात्री सत्कार समारंभ व अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुंबई म.न.पा. चे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांचा सत्कार होणार आहे. रात्री १० वा. लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ घोटगे भरणी चे बुवा विनोद चव्हाण व हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे कुडाळचे बुवा विजय (गुंडू) सावंत यांच्यात डबलबारीचा सामना होणार आहे. दि. २९ रोजी सकाळी श्री दत्त गुरूंचे पूजन, पादुकांवर अभिषेक, दुपारी महाआरती, सायंकाळी गुरुचरित्र पोथी पूजन, स्थानिक पंचक्रोशीतील भजने, रात्री दीपोत्सव, रात्री १२ वा. दत्तजन्म सोहळा, पालखी सोहळा होणार आहे. तर दि. ३० रोजी सकाळी श्री दत्तगुरूंचे पूजन, श्री दत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक, दुपारी महाआरती, महाप्रसाद, रात्री १० वा. दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. ज्या भाविकांना अन्नदान करावयाचे असेल त्यांनी ९४२०२१०००४ या क्रमांकावर संपर्क साधावा. मास्क लावून, सोशल डिस्टन्स पाळून व कोरोनाविषयक नियम पाळून भाविकांनी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
मसुरे देऊळवाडा येथे दत्त जयंती उत्सव
