सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २६ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी तालुक्यात आज २६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात २४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात बाहेरचा वाडा आणि वैश्यवाडा येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात न्हावेली, नेमळे, शिरशिंगे, तळवडे येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. तर आज गाव येथे दोन रुग्ण सापडले आहेत. तर सावरवाड येथे १८ रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ८९ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page