बॅ. खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

*⚡वेंगुर्ला ता.२४-:* वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना दिवस‘ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करणे, त्यांना राष्ट्रसेवेसाठी जागृत करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत असल्याचे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी.आर.आरोलकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.जे.वाय.नाईक यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रा.एस.जी.चुकेवाड, प्रा.व्ही.एस.चव्हाण, प्रा.विनोद पवार, सदस्य प्रा.एल.बी.नैताम, राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे डॉ.बी.जी.गायकवाड, प्रा.वामन गावडे व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page