सेवा आणि समर्पण अभियान अंतर्गत आरोग्य कर्मचारी आणि लसिकरणात सहभागी नागरिकांचा करण्यात आला सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.२४-:* वेंगुर्ला भाजपाच्यावतीने ‘सेवा आणि समर्पण अभियान‘ अंतर्गत वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय, मठ ग्रामपंचायत व अणसूर येथील लसिकरण केंद्रावर भेट देऊन रत्नागिरी-सिधुदुर्गचे संघटनमंत्री शैलेंद्र दळवी व सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या हस्ते तेथील आरोग्य कर्मचारी व लसिकरणात सहभागी नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, राजन गिरप, सोमनाथ टोमके, प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, आनंद गावडे, गणेश गावडे, वामन गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page