कर्मचाऱ्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खलीपे यांना निवेदन
*⚡वेंगुर्ले ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे कामकाज तेथे कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालीच होणे गरजेचं असून समुदाय आरोग्य अधिकारी यांचे थकित मानधन पुर्ण करावे, समुदाय आरोग्य अधिकारी यांना नियमानुसार देय असलेली वार्षिक वेतनवाढ दरवर्षी नियमित देणे, आठवड्याची व शासकीय सुट्या नियमित देणे, कोरोना कालावधीत जादा काम केलेल्या दिवसांचा मोबदला म्हणून पर्यायी रजा मंजूर करणे,समुदाय आरोग्य अधिकारी यांना इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा अधिभार देण्यात येउ नव्हे, उपकेंद्रात स्वँब घेण्याचे काम आरोग्यसेवक व आरोग्यसेविका यांनी करावे आदी मागण्या व अडचणी संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना निवेदन देण्यात आले. तसेच सदर मागण्या संदर्भात गंभीरपणे विचार करावा अशी मागणी जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या तर्फे करण्यात आली असून मागण्या व अडचणी संदर्भात इतिवृत्त संघटनेला न कळविल्यास संपूर्ण जिल्हा व राज्यात काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटने तर्फे सांगण्यात आले. यावेळी संघटना राज्य व्यवस्थापक व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सई लिंगवत,जिल्हा अध्यक्ष डॉ.सचिन नागांवकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अमोल जेवरे, डॉ.सुखदा नागावकर, डॉ .धनश्री जाधव, जिल्हा सचिव हरिष रावळ, राज्य संघटन शुभम ढाकणे, समुदाय आरोग्य अधिकारी महादेव हलमलकर, समुदाय आरोग्य अधिकारी राखी कुडतरकर, डॉ.किर्ती गायकवाड, समुदाय आरोग्य अधिकारी प्रतिक्षा चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी अंजली नेरुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
